
जिल्हा बँक बचत गटांच्या पाठीशी
gad41.jpg
86910
गडहिंग्लज : जिल्हा बँकेतर्फे झालेल्या महिला बचत गटांच्या मेळाव्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना निवेदिता माने. शेजारी सिद्धार्थ बन्ने, संतोष पाटील, स्मिता गवळी, श्रृतिका काटकर, अमरिन मुश्रीफ, मंजूषा कदम आदी. (अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------
जिल्हा बँक बचत गटांच्या पाठीशी
---
निवेदिता माने; गडहिंग्लजला महिला बचत गटांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : महिलांना एकत्र येऊन काम करण्याची संधी बचत गटांच्या माध्यमातून मिळत आहे. त्यातून मिळणारा लाभ महिलांनी घ्यावा. बचत गटांच्या अडीअडचणी सोडविल्या जातील. जिल्हा बँक बचत गटांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार व जिल्हा बँकेच्या संचालिका निवेदिता माने यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे महिला बचत गटांचा तालुकास्तरीय मेळावा झाला. या वेळी श्रीमती माने बोलत होत्या. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, अमरिन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा बँकेच्या येथील शाखेच्या सभागृहात हा मेळावा झाला. सौ. मुश्रीफ, श्री. माने, ‘दानिविप’चे अध्यक्ष रमजान अत्तार, माजी नगरसेवक हारून सय्यद, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांचीही भाषणे झाली.
शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे यांनी स्वागत केले. संचालक संतोष पाटील यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. श्रेया कोणकेरी, बनश्री चौगुले, ललिता भोसले, मंजूषा कदम, शर्मिला पोतदार, लक्ष्मी घुगरे, शैलजा पाटील, कावेरी चौगुले, रेश्मा कांबळे, रूपाली परिट, सुनीता नाईक, शारदा आजरी, ऊर्मिला जोशी, गीता देसाई आदी उपस्थित होत्या. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. बँक निरीक्षक रणजित देसाई यांनी आभार मानले.
--------
व्यवसाय उभारणीबाबत मार्गदर्शन
माजी प्राचार्या डॉ. कमला हर्डीकर, जिल्हा बँकेच्या उपनिरीक्षक (महिला विकास) गिरिजा पुजारी यांनी बचत गटाबाबतची माहिती दिली. गटांच्या माध्यमातून व्यवसाय कसा उभारावा, याबाबत मार्गदर्शन केले.