
आजरा ः मडिलगेत आठवडी बाजार
मडिलगेत आठवडी बाजार प्रारंभ
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथे भावेश्वरी बाजार समिती व ग्रामपंचायत मडिलगे यांच्यावतीने दर बुधवारी आठवडी बाजार भरणार आहे. बुधवारपासून बाजार भरण्यास सुरवात झाली. सरपंच बापू निऊगरे अध्यक्षस्थानी होते. बाजार समिती अध्यक्ष संभाजी जाधव यांच्या हस्ते ग्रामदैवत भावेश्वरी देवीला नारळ देण्यात आला. बाजार मैदानावर माजी सरपंच दीपक देसाई यांच्या हस्ते वजनकाटयाची पूजा झाली. यावेळी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपसरपंच सुशांत गुरव यांनी स्वागत केले. बाजार समितीचे उपाध्यक्ष सचिन कातकर, सचिव किशोर हारळकर, माजी सरपंच के. व्ही. येसणे, गणपतराव आरळगुळकर, ग्रामसेवक प्रताप पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती पाटील, यात्रा समितीचे अध्यक्ष प्रकाश कडगावकर, सुनील निऊगरे, विश्वास भाईगडे, पाडुरंग कुरळे, औदुत येसणे, वसंत घाटगे, गंगाराम आयवाळेसह ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव हारळकर यांनी आभार मानले.