गिरणी कामगारांच्या बैठकीत मोर्चाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरणी कामगारांच्या 
बैठकीत मोर्चाचा निर्णय
गिरणी कामगारांच्या बैठकीत मोर्चाचा निर्णय

गिरणी कामगारांच्या बैठकीत मोर्चाचा निर्णय

sakal_logo
By

87057
गडहिंग्लज : गिरणी कामगारांच्या बैठकीत बोलताना अमृता कोकितकर. शेजारी पद्मिनी पिळणकर, रामजी देसाई आदी.

गिरणी कामगारांच्या
बैठकीत मोर्चाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : सर्व श्रमिक संघातर्फे गिरणी कामगार व वारसदारांची बैठक झाली. रामजी देसाई अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत गुरुवारी (ता. ९) प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. भडगाव मार्गावरील राम मंदिरात ही बैठक झाली.
गिरणी कामगारांनी १८ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढण्यासाठी सर्व जिल्ह्यातून डिलाईल रोड (मुंबई) येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर जमले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांतर्फे आमदार मंगेश कुडाळकर यांनी गिरणी कामगारांची भेट घेतली. गिरणी कामगारांच्या प्रश्‍नांवर आठ दिवसात बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, तीन महिने होत आले तरी अद्याप आश्‍वासन पाळलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील गिरणी कामकारांची बैठक घेण्यात आली.
पद्मिनी पिळणकर यांनी प्रास्ताविक केले. गिरणी कामगार मुंबईत घर मिळावे या मागणीसाठी ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमृता कोकितकर, तानाजी कुरळे, अर्जुन पाटील यांची भाषणे झाली. या बैठकीत गुरुवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. राम मंदिरापासून दुपारी बाराला मोर्चाला सुरवात होणार आहे. मोर्चानंतर प्रांत कार्यालयावरच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय झाला. बैठकीला गिरणी कामगार, वारसदार उपस्थित होते.