
राजाराम महाविद्यालयात ‘एनएसएस’ शिबीर उत्साहात
फोटो (87209)
.......
राजाराम महाविद्यालयाचे ‘एनएसएस’ शिबीर उत्साहात
कोल्हापूर ः येथील राजाराम महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच शिवाजी विद्यापीठात पार पडले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये स्वच्छता केली. विविध मान्यवरांनी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये अविनाश देशमुख यांनी ‘महाविद्यालयीन नाट्यकला आणि व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर, तर संदीप पाटील यांनी ‘सेल्फ डिफेन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचार कसा करावा याची माहिती दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी ‘यिन’ चे सहाय्यक व्यवस्थापक अवधूत गायकवाड उपस्थित होते. शिबिराचा समारोप प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर डॉ. रघुनाथ कडाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. प्राचार्या डॉ. वाय. सी. अत्तार यांचे शिबिराच्या आयोजनासाठी मार्गदर्शन लाभले. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरज सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. शिबिर संयोजनामध्ये डॉ. व्ही. एम. देशमुख, ज्योती चव्हाण, दिपाली धावणे यांचे सहकार्य लाभले.