
चोरट्यास अटक
फोटो
....
उद्यमनगरात लोखंडी बारची
चोरी करणाऱ्याला अटक
कोल्हापूर, ता. ७ ः शिवाजी उद्यमनगरात लोखंडी बारची चोरी करणाऱ्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. आकाश सागर बागडी (वय २१, रा.चांदणी चौक, यादवनगर,कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्यांच्यासोबत अन्य दोन विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती राजामपुरी पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. चोरीची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी बाबासाहेब कोंडेकर हे कारखानदार आहेत. शिवाजी उद्यमनगरात पाच मार्चला स्टेट बॅंकेच्या शेजारी असलेल्या त्यांच्या कारखान्यातील पाच इंच लांबीचे सुमारे साडेचारशे लोखंडी नग चोरट्यांनी लंपास केले. त्यांची किंमत सुमारे १० जार २०० रुपये होते. त्यांनी याबाबतची फिर्यादी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. पोलिस काल रात्री गस्त घालत असताना वाय.पी.पोवार नगर येथे तिघेजण खांद्यावर प्लास्टीक पोते घेवून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते पोती टाकून पळून जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना पकडले. पोत्यात काय आहे याची विचारणा करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी पोत्यात काय आहे हे पाहिले असता त्यामध्ये लोखंडी बार असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी हा मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली. तिघांमध्ये आकाश हा सज्ञान असून उर्वरीत दोघे अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोलिसंनी आकाशवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
निरीक्षक तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल शिरोळे, अमर आडूळकर, समीर शेख, विशाल खराडे, विशाल शिरगांवकर, अविनाश तारळेकर, राजाराम चौगले यांनी ही कारवाई केली.