Wed, March 29, 2023

रूम सिल
रूम सिल
Published on : 7 March 2023, 2:43 am
यात्री निवासच्या
दोन रूम सील
कोल्हापूर ः ः घरफाळ्याच्या थकबाकीपोटी सोमवारी महापालिकेच्या घरफाळा विभागाने सबजेलनजीकच्या एका यात्री निवासच्या दोन रूम सील केल्या. तसेच त्या मिळकतीचा पंचनामा करून जप्ती सुपूर्दनामाही तयार करण्यात आला आहे.
सी, डी वॉर्डअंतर्गत येणाऱ्या आई महालक्ष्मी यात्री निवास या व्यावसायिक मिळकतीचे १८ लाख ७५ हजार इतकी दंडासह थकबाकी होती. सोमवारी एक तास मुदतीची नोटीस दिली होती. त्यास प्रतिसाद दिला नसल्याने या मिळकतीचा पंचनामा करून मिळकत जप्ती सुपूर्दनामा तयार केला. तसेच मिळकतीमधील दोन रूम सील केल्या.
सध्या दंड व्याज रकमेवरील ४० टक्के सवलतीचा लाभ घेऊन जप्ती, मिळकत पत्रिकेवरील बोजा नोंदसारख्या कारवाईचे प्रसंग टाळावेत. मिळकतीवरील संपूर्ण कर भरणा करावा, असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.