आरक्षित केलेली जागा क्रीडांगणासाठीच वापरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षित केलेली जागा
क्रीडांगणासाठीच वापरा
आरक्षित केलेली जागा क्रीडांगणासाठीच वापरा

आरक्षित केलेली जागा क्रीडांगणासाठीच वापरा

sakal_logo
By

आरक्षित केलेली जागा
क्रीडांगणासाठीच वापरा
कसबा बावडा-लाईन बाजार प्रभागाबाबत मागणी
कोल्हापूर, ता. ७ : कसबा बावडा-लाईन बाजार या प्रभागात क्रीडांगणाचे आरक्षण असताना अटी-शर्तीचा भंग करून जागा धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरक्षणाप्रमाणे त्या जागेचा वापर व्हावा अन्यथा जागा मूळ मालकाला परत द्याव्यात, तसेच इतर सर्व प्रभागातील आरक्षणे वगळावीत, अशी मागणी अरविंद साळोखे, उत्तम पोवार, योगेश शेटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, या प्रभागात चार एकर २१ गुंठे जमिनीवर क्रीडांगणाचे आरक्षण आहे. मालक, वटमुखत्यारधारक, विकासक यांनी शासनाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून भोगवटादार वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये समाविष्ट केली आहे. सरकारच्या अटी-शर्तीचा भंग केला आहे. आरक्षित जागेवर रस्ता तसेच प्लॉट पाडले आहेत. तसेच उपनिबंधकांकडून खरेदीपत्रे करून विक्रीचे व्यवहार केले आहेत. महसूल बुडवल्याप्रकरणी त्याची दंडासह वसुली करावी. आरक्षीत जागांमधील अर्थपूर्ण व्यवहारांसाठी तत्कालिन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चौकशी समिती नेमली होती. या चौकशी अहवालास विलंब का झाला आहे. या चौकशीत विविध ठिकाणच्या चर्चेत असलेल्या मिळकती आहेत. आरक्षित जागा शहराची गरज असताना त्या एकतर त्या ताब्यात घ्या किंवा अनाधिकृत बांधकामासह जप्त करा. दवाखान्याच्या १६,मार्केटच्या १७, वाचनालयाच्या १०, बगीचा-मैदान-आयलॅंडच्या १११, शाळांसाठीच्या २३, महापालिका कामांसाठी ६, शासकीय-निमशासकीय १३ आरक्षित जागा पडून आहेत. महापालिकेने पैसे देऊन जागा खरेदी केलेली नाही.