
गोविंद पानसरे स्मारक निधीची मागणी
87457
कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी निधीच्या मागणीचे निवेदन आमदार सतेज पाटील यांना देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते.
गोविंद पानसरे यांच्या
स्मारकासाठी निधीची मागणी
कोल्हापूर, ता. ७ : ज्येष्ठ कामगार नेते (कै) गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी पन्नास लाखांचा निधी मिळावा, अशा मागणीचे निवेदन आमदार सतेज पाटील यांना देण्यात आले.
पानसरे यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्मारकाचा निर्णय झाला होता. त्यानुसार महापालिकेत एकमताने ठराव होऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, सध्या बरीच महिने काम ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार श्री. पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. महानगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हे काम माझ्या व आमदार जयश्री जाधव यांच्या आमदार निधीतून केले जाईल. कितीही निधी लागला तरी तो कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली. शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, राज्य कौन्सिल सदस्य सम्राट मोरे, दिनकर सूर्यवंशी, वाय.एन. पाटील, बाबा ढेरे, बाळू पाटील, मिलिंद मिरजकर, रियाज शेख, मधुकर माने, उत्कर्ष पवार, लक्ष्मण माने, अतुल कवाळे, अरुण देवकुळे, सिद्धार्थ कांबळे आदींचा समावेश होता.