
सीपीआर मॉड्युलर ओटी
सीपीआरमध्ये मॉड्यूलर ओटीची सुविधा
मोफत शस्त्रक्रियेची सोय; कान, नाक, घसा रुग्णांना फायदेशीर
कोल्हापूर , ता. ७ ः सीपीआर हॉस्पिटलमध्ये कान, नाक, घसा विभागात मॉड्युलर ओटीची सुविधा सुरू आहे. यात नाक, कान, घशाशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया प्रभावी होत आहेत. येथे सवलतीत तर आर्थिकदृष्ठ्या दुर्बल घटकांना मोफत शस्त्रक्रियेची सुविधा आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.
नाक, कान, घशाशी संबंधित रुग्णांची गर्दी होती. रुग्णांची तपासणी झाली की शस्त्रक्रियेसाठी वाट पाहायला लागायची. रुग्णाचा त्रास कमी होऊन शस्त्रक्रिया वेळेत होण्यासाठी तपासणी ते शस्त्रक्रिया उपचार वेळेचे व्यवस्थापन केले. त्यासाठी बारा डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. परिणामी शस्त्रक्रिया वेळेत होत आहेत.
अनेक गुंतागुंतीच्या आजारातील गंभीर रूग्ण उपचारासाठी येतात. त्यांच्यावर शस्त्रक्रियेसाठी निर्जंतुकीकरणाची सुक्ष्म प्रक्रिया केलेला विशेष कक्ष ‘मॉड्युलर ओटी’ची सोय केली. शस्त्रक्रियेसाठी पुरक आधुनिक तंत्र साधने, सूक्ष्म तपासणी यंत्र उपलब्ध आहेत. त्यामुळे अचूक निदान होऊन शस्त्रक्रिया कमी वेळेत होते. जंतूसंसर्ग कमी होतो. रुग्ण लवकर बरा होतो. डिस्चार्ज कमी कालावधीत होतो. त्यामुळे रुग्णांची तपासणी शस्त्रक्रिया उपचाराची गती व गुणवत्ता वाढली आहे. डॉ. लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. स्नेहल सोनार, डॉ. मिलिंद सामनगडकर यांच्यासह अन्य तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे.
चौकट
दृष्टीक्षेपात...
रोज १६० रुग्णांची तपासणी
महिन्याला २०० ते २५० शस्त्रक्रिया
वर्षाला होणाऱ्या शस्त्रक्रिया
२०१५ - १११९
२०१६ -११८०
२०१७ - १३७७
२०१८ १२४७
२०१९ - १९३२
२०२१ -४२६
२०२२ -१३८०
२०२३ - २४३६
....................
कोट
आधुनिक तंत्राआधारे प्रभावी शस्त्रक्रिया होत असल्याने आठ वर्षात उपचाराला येणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. भविष्यातही कर्णबधीरांसाठी ‘कॉलक्लियर इन्प्लांट’ शस्त्रक्रियांची सुविधा करीत आहोत. रुग्णांनी उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा.
- डॉ. अजित लोकरे (कान, नाक, घसा विभागप्रमुख, सीपीआर)