ते कामगार कामावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ते कामगार कामावर
ते कामगार कामावर

ते कामगार कामावर

sakal_logo
By

‘त्या’ १६ कामगारांना
पुन्हा घेतले कामावर
कोल्हापूर , ता. ८ ः सीपीआरमध्ये डीएम कंपनीने कामावरून कमी केलेल्या त्या १६ सफाई कामगारांना पून्हा कामावर घेत असल्याचे पत्र सीपीआर प्रशासनाला दिले आहे. त्यातील १६ कामगारासह श्रमीक संघ सर्व पक्षीय असंघटीत अन्याय निवारण कृती समितीने आंदोलन करून कामगारा सहआयुक्तांकडे पाठपुरावा केला त्याला यश मिळाले.
सीपीआर रूग्णालयातील सफाई कामाचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे, येथे काम करणाऱ्या कामगारांनी किमान वेतनाच्या मागणीसाठी केली तसेच संघटनात्मक पातळीवर दाद मागीतली. त्यानंतर कंपनीने १६ कामगारांना कामावरून कमी केले. त्यांना कामावर परत घ्यावे अशी मागणी करीत कामगारांनी सुरवातीला श्रमीक संघाच्या वतीने सीपीआरमध्ये आंदोलन केले. त्यानंतर सर्वपक्षीय असंघटीत अन्याय निवारण समीतीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांकडेही प्रकरणी पाठपुरावा केला गेला. सीपीआर प्रशासनाने दखल घेतली. कामगार प्रतिनिधी, सर्व पक्षीय समिती पदाधिकारी तसेच कंपनीचे संचालक यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी एकत्र बैठक घेतली. त्यात झालेल्या चर्चेनंतर संबधीत कामगारांना कामावर घेत असल्याचे पत्र डीएम कंपनीने दिले. समिती निमंत्रक बाबा इंदूलकर, आर. के. पोवार, अतुल दिघे, बाबा पार्टे, दिलीप देसाई, संदीप देसाई, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील, श्रीकांत पाटील, अशोक भंडारी उपस्थित होते.