
उमा महेश्वर पतसंस्थेचे डोंगरे अध्यक्ष, लोंढे उपाध्यक्ष
87505
शिवाजी डोंगरे, अरुण लोंढे
उमा महेश्वर पतसंस्थेचे
डोंगरे अध्यक्ष, लोंढे उपाध्यक्ष
नूल, ता. ७ : जरळी (ता. गडहिंग्लज) येथील उमा महेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी डोंगरे यांची, तर उपाध्यक्षपदी अरुण लोंढे यांची एकमताने निवड करण्यात आली. सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी विजय तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी झाल्या. संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली. या वेळी नूतन अध्यक्ष डोंगरे व उपाध्यक्ष लोंढे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. बैठकीस संचालक तुकाराम दुंडगे, शिवगोंडा देसाई, प्रा. शिवाजी होडगे, अमृत भोसले, आप्पासाहेब माद्याळे, मधुकर वाघमोडे, कार्तिक स्वामी, रावसाहेब कांबळे, श्रीमती रेखा तोरस्कर, कविता भोसले यांच्यासह सचिव मारुती गुडीमनी, शरद मंगसुळे, विठ्ठल चौगुले उपस्थित होते.