आरटीओ -ट्क चालक निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीओ -ट्क चालक निवेदन
आरटीओ -ट्क चालक निवेदन

आरटीओ -ट्क चालक निवेदन

sakal_logo
By

87547

स्पीड गव्हर्नर नसलेल्या वाहनांना मुदत द्या
लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनची मागणी; शासनस्तरावर पाठपुरावा करा ः दीपक पाटील

कोल्हापूर, ता. ७ - वाहनांना स्पीड गव्हर्नर न बसविलेल्या वाहनांना तीन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्याकडे केली. यावेळी त्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करावेत, असे श्री. पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
बीएस ४ व बीएस ६ वाहनांना इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ईसीयू) प्रणाली आहे त्यांना पासिंगसंदर्भात अडचण येणार नाही. स्पीड गव्हर्नरची परिवहन कार्यालय पोर्टलला नोंद असेल तिही वाहने पासिंग होतील. ज्यांची नोंद कार्यालय पोर्टलला नसेल त्यांना स्पीड गव्हर्नर बसवणे बंधनकारक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
चर्चेत १ ते ४ मार्चमध्ये जी वाहने मोरेवाडी आरटीओ टेस्टिंग ट्रॅकवर आली होती व त्यांचे व्हिडिओ शूटिंग झाले आहे, त्या वाहनांना पासिंग करून फिटनेस प्रमाणपत्र दिले जाईल. त्यांना पुन्हा ‘ट्रॅक’वर वाहन आणण्याची आवश्यकता नाही. यामुळे ८० ते ८५ टक्के वाहनांची पासिंगची समस्या निकाली निघाली आहे. राहिलेल्या १० ते १५ टक्के वाहनांच्या पासिंगसंदर्भात असोसिएशनमार्फत परिवहनमंत्री व परिवहन आयुक्तसोबत बैठक घेऊन सदरचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय झाला. याबाबतचे निवेदन परिवहन आयुक्त व मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना पाठवले आहे.
डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, संचालक शिवाजी चौगुले, विलास पाटील, विजय भोसले, विक्रम पाटील, उमेश महाडिक, अजित माने, राजेश घोगळे, सतीश ढणाल, वाळू वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, विजय तेरदाळकर, अतुल जाधव, राहुल मुळे, गौसभाई मुल्ला, योगीराज केसरकर, विशाल राजापुरे, समाधान वंजाळे, अभिजित पाटील, विजय चव्हाण, कोल्हापूर रेल्वे मालधक्का ट्रकचालक-मालक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय कडवेकर, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, संजय सावंत, सुभाष आढावकर, किरण पाटील, आबा लोळगे, तुकाराम पाटील आदी उपस्थित होते.