प्रवेश रद्द विरोधात ‘एलएलएम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवेश रद्द विरोधात ‘एलएलएम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचे उपोषण
प्रवेश रद्द विरोधात ‘एलएलएम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचे उपोषण

प्रवेश रद्द विरोधात ‘एलएलएम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचे उपोषण

sakal_logo
By

प्रवेश रद्द विरोधात ‘एलएलएम’
अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचे उपोषण

कोल्हापूर ः शिस्तभंगाची कारवाई म्हणून शिवाजी विद्यापीठाने बेकायदेशीरपणे तडकाफडकी निर्णय घेवून माझा प्रवेश रद्द केला असल्याचे सांगत अभिजित खोत या विद्यार्थ्याने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशदारात आंदोलन करत आहे.याबाबत अभिजित याने सांगितले की, ‘एलएलएम’ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात मी शिकत आहे. सर्व प्रकारच्या असाइन्मेंट आणि व्हायवा दिलेल्या आहेत. मात्र, तरी देखील शिस्तभंगाची कारवाई म्हणून विद्यापीठाने माझा प्रवेश रद्द केला आहे. माझ्याकडून २८ डिसेंबर रोजी अंडर प्रेशर खाली ‘मी इथून पुढे कोणतेही आंदोलन करणार नाही’असे लिहून घेतले होते. परंतु, मी ६ ते २६ डिसेंबर आणि २ ते ५ जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबईमध्ये होतो. काही विभागाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात विद्यापीठात ३० तारखेला आंदोलन करण्यात येणार होते. परंतु, मला पोलीस ठाण्यामधून रितसर परवानगी मिळाली नसल्याने केवळ विद्यापीठाला निवेदन आणि घोषणा दिल्या होत्या. मात्र, कारणे दाखवा नोटीस न देता बेकायदेशीरपणे ३१ डिसेंबर रोजी माझा प्रवेश रद्द करण्यात आला. मला १६ मार्चपासून होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी विद्यापीठाने द्यावी.