Thur, March 30, 2023

कराटे यश
कराटे यश
Published on : 10 March 2023, 4:25 am
12282
चाणक्य मार्शल आर्टस् चे यश
कोल्हापूर, ता. १० : सांगली येथे झालेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत चाणक्य मार्शल आर्टसच्या कराटेपटूंनी यश मिळविले. त्यांनी वीस सुवर्ण, सात रौप्य व पंधरा कास्यपदके पटकावली. फेडरेशफ ऑफ महाराष्ट्रतर्फे स्पर्धेचे संयोजन करण्यात आले.
यशस्वी असे : प्राप्ती शिंदे, सेजल शहा, पोरस शहा, आर्या पाटील, आरूष धुमाळ, तृप्ती मोरे, रिदा गार्डी, रूतबा गार्डी, राजनंदिनी लाड, आयांश यादव, रूद्र खाडे, प्रणिल बागवडे, विराज शिंदे, आराध्या चौगुले, हर्षवर्धन भालेकर, वैष्णवी कोळी, वेदांत वाईकर, वेदर्शा जाधव, जोया खान, आराध्या विराज कंबार. त्यांना प्रशिक्षक संदीप लाड, पूजा चौगुले, स्वाती माने, गौरी इंगळे, प्रियांका करवळ, कृष्णा माने यांचे मार्गदर्शन मिळाले.