
आठवड्यात २७९ ठिकाणी छापे
आठवड्यात २७९ ठिकाणी
ओपन बारवर छापे
कोल्हापूर, ता. ७ ः ओपन बार आणि गांजा ओढणाऱ्यांच्या अड्ड्यांवर शहरातील चारही पोलिस ठाण्यांतील पोलिसांनी एक ते सहा मार्च दरम्यान एका आठवड्यात २७९ ठिकाणी छापे टाकून ३१० जणांवर कारवाई केली.
शहर आणि परिसरातील रिकाम्या जागा, रिंगरोड हे ओपन बार आणि गांजा ओडणाऱ्यांचे अड्डेच झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनी एक ते सहा मार्च दरम्यान त्यांच्या हद्दीत छापे टाकून कारवाई केली. आर,के.नगर माळ, महावीर गार्डन, राजाराम बंधारा, सासने ग्राऊंड, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसर, राजाराम तलाव, रंकाळा परिसरातील रिकाम्या जागा, आयसोलेशन हॉस्पिटल रिंगरोड, शेंडा पार्क, पंचगंगा घाटपरिसरात सुद्धा ओपन बार असल्याचे दिसून येत होते.
----------
कारवाई अशी
------
पोलिस ठाणे ओपन बार गांजा पिणारे
शाहूपुरी पोलिस ठाणे --- १४७ गुन्हे १४९ आरोपी २ गुन्हे --- २ आरोपी
लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे --- ५७ गुन्हे ६३ आरोपी ३ गुन्हे --४ आरोपी
जुना राजवाडा पोलिस ठाणे ---३५ गुन्हे ४६ आरोपी ४ गुन्हे ---- ८ आरोपी
राजारामपुरी पोलिस ठाणे --- ३१ गुन्हे ३८ आरोपी -------निरंक------------
-