वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणी
वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणी

वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीची मागणी

sakal_logo
By

वीज वाहिन्यांच्या
दुरुस्तीची मागणी
गडहिंग्लज : वीज वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होत असल्याने शॉर्ट सर्किटचा धोका आहे. त्यामुळे वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. माळवाडी येथील शेतातून वीज वाहिन्या गेल्या आहेत. या वीज वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होत आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याचा धोका आहे. यातून ठिणगी पडून आग लागल्यास शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. सतीश कदम यांनी हे निवेदन दिले आहे.