७ किलोची गाठ काढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७ किलोची गाठ काढली
७ किलोची गाठ काढली

७ किलोची गाठ काढली

sakal_logo
By

‘सीपीआरमध्ये’ महिलेच्या
पोटातून काढली ९ किलोची गाठ

कोल्हापूर , ८ ः शुल्लक अडचणीत पतीने पत्नीची साथ सोडली. त्यासोबत जन्म दिलेल्या दोन मुलांनी आईची साथ सोडली. निराधार आई राधानगरी तालुक्यातून शहरात आली. आईला गंभीर पोट विकाराने घेरलं. तशी अडीच वर्षे वेदनेने तळमत होती. अखेर सीपीआरचे निष्णात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या आईप्रमाणे तिची काळजी घेतली. शस्त्रक्रियेद्वारे तिच्या पोटातून सात व दोन किलोच्या दोन गाठी काढून तिला जीवदान दिले.
सधन कुंटूंबातील मध्यमवयीन महिला सीपीआरमध्ये कोरोनाकाळात उपचाराला आली. तिला पोट विकार होता. काही चाचण्या करून पोटातील मोठी गाठ असल्याचे आढळले तेव्हा सीपीआरने त्या महिलेला कामा हॉस्पिटल मुंबईला पाठवले. मात्र तिथे गाठ कॅन्सरची असावी असा अंदाज करून त्या महिलेवर पुढील उपचार नाकारले. महिला सीपीआरकडे आली. मेडीसीन विभागात दाखल केल. तपसाण्यात तिच्या पोटात गाठ होती. गाठ कॅन्सरची आहे का याची तपासणी झाली. यात सुदैवाने कॅन्सर नव्हता हेही स्पष्ठ झाले. सीपीआर स्त्री रोग विभागात शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. स्त्री रोग तज्ञ डॉ. शिरीष शानबाग, डॉ.भूपेश गायकवाड, डॉ. जोत्सना देशमुख यांनी पुढाकार घेतला. भूलतज्ञ डॉ. मारूती पाटील, डॉ. प्रदीप राऊत, डॉ. राहूल जाधव आदीच्या पथकाने जोखीम पत्करत दोन तास शस्त्रक्रिया केली. यात ४० बाय ४० सेमीची एक सात किलोची तर दुसरी दोन किलोची मासंल गाठ काढली त्यात भरलेले पाणी बाहेर काढले. तसा महिलेच्या पोटाचा घेर कमी व वेदना कमी होऊऩ जीव घेण्याआजारातून महिला सुखरूप बाहेर पडली. मेडीसन विभागाचे डॉ. महेंद्र बनसोडे, डॉ. अनिता परितेकर यांनी महिलेची काळजी घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, अधिक्षक डॉ. गिरीश कांबळे, डॉ. प्रिया होंबाळकर, सामाजिक अधिक्षक शशिकांत राऊळ यांनी विशेष परिश्रम घेतले