हद्दवाढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दवाढी
हद्दवाढी

हद्दवाढी

sakal_logo
By

L87813
मुंबई ः विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी कोल्हापूर हद्दवाढीबाबत लक्षवेधी मांडताना जयश्री जाधव.

महापालिका निवडणुकीनंतर
हद्दवाढीचा विचार : सामंत
जयश्री जाधव यांच्या लक्षवेधीवर लेखी उत्तर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : कोल्हापूर हद्दवाढीच्या प्रस्तावाबाबत महापालिका निवडणुकीनंतर निर्णय घेऊ, असे आश्‍वासन नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी आज विधिमंडळात दिले. आमदार जयश्री जाधव यांनी लक्षवेधीद्वारे हद्दवाढीच्या प्रस्तावाकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
आमदार जयश्री जाधव यांनी लक्षवेधीत म्हटले होते, की शहराची हद्दवाढ ५० वर्षांपासून रखडली आहे. त्यातून राज्य व केंद्राच्या विविध योजनेतून निधी मिळवण्यास अडचणी येत असल्याने विकास खुंटला आहे. महापालिकेने २०१३ पासून २०२१ पर्यंत चारवेळा हद्दवाढीचे प्रस्ताव सादर केले. २०१४ मध्ये १७ गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्या साऱ्यांवर सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागवला होता. त्यानुसार फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ गावे व दोन एमआयडीसींसह प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर अद्याप निर्णय नाही. या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी. शासनाच्या उदासीन धोरणामुळे हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढ झाली पाहिजे, अशी जनभावना आहे. त्यासाठी नागरिकांनी वारंवार आंदोलने केली आहेत. शासनाने त्याची दखल घेतलेली नाही. शहराची वाढ नसल्याने नवे उद्योग येत नाहीत. उद्योजकांनी विस्तारीकरण थांबवले असून काहींनी गाशा गुंडाळला.
त्याबाबत सरकारने लेखी उत्तर दिले आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी सुधारित आदेश दिले आहेत. सभागृहाची मुदत संपत असेल, अशा महापालिकांना त्याच्या सहा महिने अगोदर निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत हद्दवाढीबाबत प्रक्रिया करता येणार नाही, असे त्यात म्हटले आहे. आमदार जाधव यांनी त्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पुढे करून सरकार जबाबदारी झटकत आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर सरकारने तातडीने प्रस्तावित हद्दवाढ करावी, असे म्हटले आहे.