१५ मार्च नंतर आंदोलन तीव्र करणार ः भारत पाटणकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ मार्च नंतर आंदोलन तीव्र करणार  ः भारत पाटणकर
१५ मार्च नंतर आंदोलन तीव्र करणार ः भारत पाटणकर

१५ मार्च नंतर आंदोलन तीव्र करणार ः भारत पाटणकर

sakal_logo
By

फोटो
...


शासन उदासीन, १५ मार्चपासून तीव्र आंदोलन

डॉ. भारत पाटणकर यांचा इशाराः धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा १० वा दिवस

कोल्हापूर, ता. ८ ः ‘धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांचा विकासात समान वाटा आहे. धरणाच्या पाण्यामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला. पण त्यामध्ये भांडवलदारांचाच विकास झाला. आमच्यापर्यंत विकास पोहचलाच नाही. त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत. पण अजूनही सरकार बैठक लावत नाही. त्यामुळे १५ मार्चनंतर शांततेने पण तीव्र आंदोलन करणार आहोत,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिला. आज त्यांनी धरणग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला भेट दिली.
धरणग्रस्तांच्या आंदोलनाचा आज १० वा दिवस होता. पाटणकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी पाटणकर म्हणाले, ‘धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त हे कष्टकरून जगणारे आहेत. आमच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आम्ही येथे आंदोलन करत आहोत. कारण आम्हाला विकासात समान हक्क मिळाला नाही. कोयना आणि बामणोली येथेही अशाच पद्धतीने आंदोलन सुरू आहे. पण सरकार आमच्या प्रश्नांसाठी बैठक लावत नाही. धरणामुळे महाराष्ट्र समृद्ध झाला, पण भांडवलदारांचा विकास झाला. धरणग्रस्तांपर्यांत विकास पोहचलाच नाही. शासनाने जर १५ मार्चपर्यंत बैठक बोलावली नाही. तर आम्ही शांततेच्या मार्गानेच पण तीव्र आंदोलन करू.’ यावेळी जिल्हा अध्यक्ष मारुती पाटील यांच्यासह धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.