Fri, March 24, 2023

सलाम संविधान महाजलसामकार्यक्रम रविवारी
सलाम संविधान महाजलसामकार्यक्रम रविवारी
Published on : 9 March 2023, 3:46 am
सलाम संविधान महाजलसा
कार्यक्रम रविवारी
कोल्हापूर : अश्वघोष आर्ट ॲण्ड कल्चर फाउंडेशन व श्रावस्ती बहुद्देशीय सेवा संस्थेतर्फे रविवारी (ता. १२) सलाम संविधान महाजलसा होणार आहे. दसरा चौक मैदानात सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होईल. गायक कबीर नाईकनवरे, प्रवीण डोणे यांचे या वेळी गायन होईल. या कार्यक्रमात प्रबोधनपर गीते सादर होणार आहेत. ‘जय भीम बोल’ या गीताचे लोकार्पणही होईल. गायक मंदार पाटील, गायिका सई लकडे, रविराज सदाजय, ओंकार कांबळे, दर्शन सुतार, आकाश शिंदे यांचे गायन व वादन होणार आहे. संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान, बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, बुद्ध गार्डन संवर्धन विकास सेवा संस्था, ब्लू लाईन फाउंडेशन, स्टुडंट फेडरेशन आदी संस्था संयोजन करतील, अशी माहिती भन्ते आर. आनंद, कबीर नाईकनवरे, सतीश भारतवासी यांनी दिली.