
स्पिंग फेस्टला प्रतिसाद
88019
वसंतोत्सवात दुसऱ्या दिवशी
नैसर्गिक रंगाची प्रात्यक्षिके
कोल्हापूर, ता. ९ ः गार्डन्स क्लबतर्फे आयोजित वसंतोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणपूरक रंगनिर्मितीच्या कार्यशाळेतून पर्यावरणपूरक रंगाबाबत जागृती करण्यात आली. संगीता सावर्डेकर यांनी स्वयंपाकघरातील जिन्नस तसेच पाना-फुलांच्या वापरातून नैसर्गिक रंगनिर्मितीचे धडे दिले. रूईकर कॉलनी मैदानावर ही कार्यशाळा झाली. दरम्यान, गार्डन्स क्लबतर्फे घेण्यात आलेल्या गार्डनिंग कोर्सच्या चौथ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना उपवनसंरक्षक निता कट्टे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान केले. यावेळी वेदांतिका माने, प्रमिला बत्तासे, दीपाली तायवाडे-पाटील, रश्मी भूमकर, स्मिता अथणे, सीमा कदम, सुषमा शेवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, उत्सवाच्या अखेरच्या दिवशी महोत्सवास मोठी गर्दी केली. उत्सवाचे संयोजन अध्यक्षा कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, राज अथणे, मयंका पाटील, तेजल सावंत यांनी केले.