महाव्दार व्यापारी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाव्दार व्यापारी निवेदन
महाव्दार व्यापारी निवेदन

महाव्दार व्यापारी निवेदन

sakal_logo
By

88022

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास
सर्वांना विश्वासात घेऊनच ः क्षीरसागर

महाद्वार व्यापारी असोसिएशनचे निवेदन

कोल्हापूर, ता. ९ : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकासकामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन कामांचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच प्रशासनाला दिल्या आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास केला जाईल, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज त्यांना निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, चंद्रकांत यादव, संघटनेचे अध्यक्ष शामराव जोशी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, संचालक राहुल नष्टे, राकेश माने, सागर कदम, दिलीप धर्माधिकारी, शुभला वणकुद्रे, अलका सुगंधी, प्रतिभा वाकरेकर आदी उपस्थित होते.