
अर्जुन मोंगलेचे हातकणंगलेत जल्लोषी स्वागत
ich92.jpg
88222
हातकणंगले : कनिष्ठ भारत श्री विजेत्या अर्जुन मोंगलेच्या सत्कारादरम्यान दीपक वाडकर, रमजान मुजावर, संदीप कारंडे आदी.
----------
अर्जुन मोंगलेचे हातकणंगलेत जल्लोषी स्वागत
हातकणंगले, ता. १० : कनिष्ठ भारत श्री विजेता शरीरसौष्ठवपट्टू अर्जुन मोंगले (हातकणंगले) याचे शहरामध्ये सायंकाळी जल्लोषात स्वागत केले. उघड्या जीपमधून फटाक्यांची आतषबाजी करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून त्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी जागोजागी महिलांनी त्याचे औक्षण करून त्याला शुभेच्छा दिल्या.
रतलाम (मध्यप्रदेश) येथे झालेल्या तेराव्या कनिष्ठ भारत श्री स्पर्धेत हातकणंगले येथील अर्जुन मोंगले याने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून भारत श्रीचा किताब पटकावला. स्पर्धेत ४०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आजवर अर्जुनने विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून सुवर्णपदक मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या ज्युनिअर महाराष्ट्र श्री स्पर्धेतही त्याने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.
त्याचे शहरात आगमन होताच त्याची उघड्या जीपमधून शहरातील प्रमुख मार्गावरून ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. एन. एस. जीमचे संचालक नागेश सुतार, अतुल मंडपे, नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर, संदीप कारंडे, बाबासो शिंदे आदींनी मनोगत व्यक्त करत त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दीपक वाडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कृष्णात चव्हाण यांनी आभार मानले. रावसो कारंडे, सुभाष मोरे, रमजान मुजावर, संदीप कांबळे, दीपक कुन्नुरे, सुरेश कोळी, दिनानाथ मोरे, गुलाब शेख, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.