
महापालिकेत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची स्थापना
88046
मारुती कांबळे
‘रिपब्लिकन एम्प्लॉईज’चे अध्यक्ष कांबळे
कोल्हापूर : महापालिकेत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षस्थानी मारुती कांबळे यांची, तर सरचिटणीसपदी तानाजी मेंगाणे यांची निवड करण्यात आली. रिपब्लिकन पार्टीचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी घोषणा केली. टाऊन हॉल गार्डनमध्ये झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. अधिकृत संघटनेची स्थापना करून महापालिका व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. रोजंदारी, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, केएमटीचे नवीन वेळापत्रक तयार करावे, स्वच्छतागृहे बांधावीत, कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृह द्यावे, असे ठरावही करण्यात आले. अन्य कार्यकारिणी अशी- विनोद यमगर्णीकर (उपाध्यक्ष), दत्तात्रय बामणेकर (खजिनदार), सागर वैराट (सहसचिव), अरविंद पोतदार, पुंडलिक पोवार, काशीनाथ कोथीरे, मिलिंद सुतार, अमन पिंजारे, विजय सुतार (सदस्य).