मिलेट वॉक बातमी

मिलेट वॉक बातमी

Published on

88020
कोल्हापूर ः तृण धान्यांच्या जनजागृतीसाठी गुरुवारी रॅली काढण्यात आली.

बाईक रॅलीतून तृण धान्य जागृती
कृषी विभागातर्फे आयोजन; पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिलेट वॉक’ आणि ‘मिलेट बाईक’ रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक आणि तृणधान्य उत्पादक सहभागी झाले होते. रॅलीचे उद्‍घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झाले.
सायबर कॉलेजपासून आईचा पुतळा-राजारामपुरी मुख्य रस्ता-बागल चौक-पार्वती टॉकीज-शाहूपुरी मेन रोड-गोकुळ हॉटेल-व्हिनस कॉर्नर-फोर्ड कॉर्नर- आयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौकात मिलेट बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. याच वेळी मिलेट वॉक काढण्यात आला.
या रॅलीतून नागरिकांनी तृणधान्याचा वापर करावा याबद्दलचे प्रबोधन करण्यात आले. रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी आभार मानले.
रॅलीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा विपणन अधिकारी चंद्रकांत खाडे, पणन विभागाचे सरव्यवस्थापक सुभाष घुले, डॉ. देवेंद्र रासकर व डॉ. योगेश बन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------
चौकट
आहारात महत्वाचे स्थान
हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ म्हणून साजरे करण्यात येत आहे. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, राजगिरा, राळा, सावा, कोडो, कुटकी यासारखे पौष्टिक तृणधान्ये लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन सारख्या पोषक घटकाने समृध्द असून ग्लुटेनमुक्त आहेत. पौष्टिक तृणधान्ये डायरिया, बध्दकोष्टता, आतड्याच्या आजारास प्रतिबंधक करतात. तसेच मधूमेह, ह्दयविकार, ॲनेमिया, उच्च रक्तदाब रोधक आहेत. याचबरोबर पौष्टीक तृणधान्याचे पदार्थ कॅल्शियमची कमतरता कमी करत असल्याने आहारामध्ये त्यांना महत्वाचे स्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com