‘पोदार’मध्ये संक्रमण उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पोदार’मध्ये संक्रमण उपक्रम
‘पोदार’मध्ये संक्रमण उपक्रम

‘पोदार’मध्ये संक्रमण उपक्रम

sakal_logo
By

‘पोदार’मध्ये संक्रमण उपक्रम
इचलकरंजी : संक्रमण करणे म्हणजे एक टप्पा पुढे जाणे मग ते संक्रमण जन्मपूर्व आईच्या गर्भातून जगाकडे असो अगर आपल्या आईचा हात सोडून शालेय जीवनाकडे असो. पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकले या शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक विभागातून प्राथमिक विभागात म्हणजे पहिलीत संक्रमित होणार आहेत. हे संक्रमण त्यांना त्रासदायक न होता आनंददायी व्हावे यासाठी प्राचार्य ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापीका पूजा चौधरी यांच्या सहकार्याने शालेय परिपाठ कसा असतो. याचा अनुभव त्यांना दिला. त्याचबरोबर पहिलीचे व तेथील शिक्षकांचीही त्यांनी भेट घेतली. एक तास पहिलीच्या वर्गात बसून शिकण्याचा अनुभवही या विद्यार्थ्यांनी घेतला.
----------------
ich101.jpg
88091
हर्षदा करंबेळकर, शर्वरी माळी

शर्वरी माळीचे यश
इचलकरंजी : डेरवण येथे झालेल्या नवव्या राज्यस्तरीय योगा स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी शर्वरी माळी हिने १४ वर्षाखालील तर हर्षदा करंबेळकरने १७ वर्षाखालील ट्रेडिशनल या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. दोघींना प्रशालेची क्रीडा विभागप्रमुख प्रा. शेखर शहा यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, श्रीनिवास बोहरा, कृष्णा बोहरा, उदय लोखंडे, जगोपाल डाळ्या, बाबासाहेब वडिंगे, मारुतराव निमकर यांचे सहकार्य लाभले.
-----------------
ich102.jpg
88092
इचलकरंजी : कुलरत्नभूषण महाराज यांनी अब्दुललाट येथे इंडिया नही भारत बोलो या विषयावर मार्गदर्शन केले.

अब्दुललाट येथे व्याख्यान
इचलकरंजी : माणुसकीची शिकवण देणारे सर्व संत भारत देशात जन्मास आले म्हणून भारत हा जगात महान आहे. कोणताही धर्म हा मानवतेची शिकवण देतो. आणि मानवता धर्म हा सर्व धर्माचा सार आहे. हिंदू जैन, बौद्ध, मुस्लिम, वीरशैव या व इतर धर्माचा भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. विश्वातील प्राणीमात्रावर त्यांच्या जन्मामुळे कोणीही उच्‍च नीच मानत नाही. हेच सर्व संतांनी सांगीतले आहे, असे मत आचार्यरत्न कुलरत्नभूषण महाराज यांनी येथे व्यक्त केले. ते अब्दुललाट येथे ‘इंडिया नही भारत बोलो’ या विषयावर बोलत होते. अभिनव मंजूनाथ महाराज यांचेही प्रवचन झाले.
------------------
ich103.jpg
88093
इचलकरंजी : नेहा कुंभार यांना महिला उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नेहा कुंभार यांना महिला उद्योजक पुरस्कार
इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिका व लायन्स क्लबतर्फे महिला दिनानिमित आयोजित कार्यक्रमात नेहा कुंभार यांना महिला उद्योजक पुरस्कार प्रदान केला. कुंभार यांनी सृजन इमिटेशन ज्वेलर्स या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. यासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून कन्या हायस्कूल, गंगामाई हायस्कूल, जिवाई कॉलेज, इचलकरंजी, खोतवाडी, कसबे डिग्रज, कांचनपूर, हुपरी, सांगली जिल्हामध्ये मुलींना दागिने बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या कार्याची दाखल घेत पुरस्कार दिला आहे.