डॉ. आंबेडकर फुटबॉल क्लब अजिंक्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. आंबेडकर फुटबॉल क्लब अजिंक्य
डॉ. आंबेडकर फुटबॉल क्लब अजिंक्य

डॉ. आंबेडकर फुटबॉल क्लब अजिंक्य

sakal_logo
By

gad104.jpg
88140
डेरवण : युथ गेम्स स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेला संघ व चषकासमवेत मार्गदर्शक महेश सलवादे, संतोष चिकोडे, रुनी सलवादे, सोन्या कांबळे आदी.
---------------------------------------------------------------
डॉ. आंबेडकर फुटबॉल क्लब अजिंक्य
गडहिंग्लजचा संघ : डेरवणमध्ये १४ वर्षाखालील स्पर्धेत मुंबईला नमवले
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : चिपळूण तालुक्यातील डेरवणमध्ये झालेल्या डेरवन युथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लबने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात मुंबई एफसी संघाला नमवून क्लबने चषकासह १५ हजाराचे रोख पारितोषिक पटकावले.
चुरशीच्या अंतिम सामन्यात पूर्वाधात आंबेडकर क्लबच्या अथर्व पकाले, संस्कार गवळी, रितेश मोरे यांनी शॉर्ट पासेसद्वारे अनेक चढाया करुन मुंबई संघाला जेरीस आणले. ज्ञानेश कावडे याने मैदानी गोल करत क्लबला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात मुंबई संघाला कोणतीही संधी न देता आंबेडकर संघाने १-० गोल फरकाने विजय मिळवित चषकावर आपले नाव कोरले.
साखळी सामन्यात डॉ. आंबेडकर संघाने झील स्कूलला ६-०, कोल्हापूरच्या एस-३ अकॅडमीला २-० तर सेमी फायनलमध्ये गडहिंग्लज युनायटेड संघाचा २-० अशा गोल फरकाने पराभव केला. या सर्व सामान्यात कर्णधार संस्कार गवळी, समर्थ गुंठे, दर्शन तरवाळ, गणेश कोड्याळे, ज्ञानेश कावडे, रेहान बोजगर यांनी सुरेख गोल करुन संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहचवले. संघाला प्रशिक्षक रुनी सलवादे, सोन्या कांबळे, अध्यक्ष महेश सलवादे, शेखर बारामती, संतोष चिकोडे, नितीन शेटके, राहूल मोरे, प्रकाश कांबळे, राकेश सलवादे, अक्रम पटेल, इक्बाल नंदीकर यांचे मार्गदर्शन मिळाले. संघात कर्णधार संस्कार गवळी, उपकर्णधार दर्शन तरवाळ, समर्थ गुंठे, अनमोल तरवाळ, प्रेम कांबळे, अथर्व पकाले, सागर गवळी, ज्ञानेश कावडे, व्यंकटेश गवळी, लक्ष्मण गुरव, रेहान बोजगर, गणेश कोड्याळे, साई म्हेत्री, रितेश मोरे, अजिंक्य घोरपडे, गोविंदा बिलावर, सिद्धार्थ धुमाळ या खेळाडूंचा समावेश होता.