
कुटुंबाचा आदर करा, आनंद मिळेल
gad108.jpg
88166
गडहिंग्लज : रवळनाथच्या प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात बोलताना डॉ. माधवी पवार. एम. एल. चौगुले, मीना रिंगणे, रेखा पोतदार, उमा तोरगल्ली, प्रा. व्ही. के. मायदेव उपस्थित होते.
------------------------------------------------
कुटुंबाचा आदर करा, आनंद मिळेल
---
प्राचार्या माधवी पवार; ‘रवळनाथ’च्या महिला प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : जीवनात येणाऱ्या सर्व गोष्टी स्वीकारा, त्यावर मात करून जिद्दीने उभे राहा. कुटुंबातील सर्वांचा आदर करा, नेहमी कुटुंबालाच प्राधान्य द्या. म्हणजे नक्कीच आपले जीवन आनंदी होईल, असा विश्वास प्राचार्या डॉ. माधवी पवार (कोवाड) यांनी महिलांना दिला.
राष्ट्रीय सहकारी संघाच्या सहकार्याने श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित ब्यूटी पार्लर व कापडी पिशव्यांच्या प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते.
श्री. चौगुले म्हणाले, की राष्ट्रीय सहकारी संघाच्या सहकार्याने विविध अभ्यासक्रम राबवून अधिकाधिक महिलांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी बहुउद्देशीय सहकारी संस्था सुरू करण्याचा मानस आहे.
‘एमपीएससी’द्वारे अधिकारीपदी निवड झालेले रोहित आरबोळे यांचा संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. श्री. आरबोळे, रेश्मा परीट व स्वाती सांगावकर यांची भाषणे झाली. दरम्यान, महिलांनी तयार केलेल्या पिशव्यांचे प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी मांडले होते. ब्यूटी पार्लर प्रशिक्षित महिलांनी आत्मसात केलेल्या कौशल्याचे सादरीकरण केले. संचालक महेश मजती, प्रा. विजय आरबोळे, प्रा. दत्ता पाटील, उमा तोरगल्ली, नीता पाटील, लक्ष्मी घुगरे, संपदा चौगुले, ममता मजती, भारती मडलगी, ऊर्मिला जोशी, गीता चिंचणेकर, मीनाक्षी गिजवणेकर, प्रशिक्षिका सीमा जाधव, आसावरी स्वामी व सभासद, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संचालिका मीना रिंगणे यांनी स्वागत केले. कल्पना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका रेखा पोतदार यांनी आभार मानले.