साळोखे पार्क निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साळोखे पार्क निवेदन
साळोखे पार्क निवेदन

साळोखे पार्क निवेदन

sakal_logo
By

88262

साळोखे पार्कमधील मागण्या पूर्ण
केल्या नाही तर मनपास घेराओ

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा इशारा

कोल्हापूर, ता. १० ः साळोखे पार्कमधील ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा तसेच बुद्ध गार्डनजवळ नाल्याच्या बांधकामाबाबतच्या मागण्या महिन्यात पूर्ण केल्या नाही तर महापालिकेला घेराओ घालण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने निवेदनाद्वारे महापालिकेचे जलअभियंता हर्षजित घाटगे यांना दिला.
निवेदनात म्हटले आहे, येथील नागरिकांना झोपडपट्टी कार्डऐवजी प्रॉपर्टी कार्ड मिळावे. तसेच दलितवस्ती निधीचा वापर करून ड्रेनेज लाईन पूर्ण करावी. पाणीपुरवठा सकाळी वा सायंकाळी करावा. बुद्ध गार्डनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या परिसरात सफाई केली जावी. तसेच शेजारील जयंती नाल्याचे बांधकाम करावे. हायमास्ट लाईट सुरू करावेत. शिष्टमंडळात सोमनाथ घोडेराव, विनोद शिंदे, तानाजी निकम, अकबर महात, मीरा घोडेराव, अब्बास शेख, टिंकू देशपांडे, सिद्धार्थ घोडेराव यांचा समावेश होता.