सीपीआर घरफाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर घरफाळा
सीपीआर घरफाळा

सीपीआर घरफाळा

sakal_logo
By

घरफाळा थकबाकीच्या दंडात
सवलतीलसाठी सीपीआरचा प्रयत्न
कोल्हापूर, ता. १० ः गेल्या काही वर्षांपासून सीपीआरचा घरफाळा थकला असून, दंड व्याजासह ७२ लाखांवर गेला आहे. त्यातील दंडात सवलत मिळावी, यासाठी अधिष्ठाता प्रदीप दीक्षित यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली.
महापालिकेने घरफाळा थकलेल्या संस्था, कार्यालये, नागरिकांकडे वसुलीसाठी प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी कर्मचारी सीपीआरमध्ये जाऊन थकबाकी भरण्याची सूचना करून आले. त्यानंतर सीपीआरचे अधिष्ठाता दीक्षित यांनी प्रशासकांची भेट घेऊन माहिती दिली. ७२ लाखांवर थकबाकी दिसत असली तरी यापूर्वी काही बिले भरली आहेत. तसेच शासकीय कार्यालय असल्याने दंडात सवलत मिळावी. गेल्या काही वर्षापासून बिले मिळालीच नसल्याचेही सांगितले. घरफाळा विभागाने विविध कार्यालयांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.