एच ३ व एन २ काळजी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एच ३ व एन २ काळजी घ्या
एच ३ व एन २ काळजी घ्या

एच ३ व एन २ काळजी घ्या

sakal_logo
By

वेळीच उपचार, विश्रांती घ्या
‘एच ३-एन २’चा प्रादुर्भाव; जिल्ह्यात मात्र गंभीर स्थिती नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : ‘‘बदलत्या हवामानानुसार घराघरांत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण आहेत. यात देशभरात ‘एच ३ एन २’ या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे विषाणू जन्य संसर्ग (व्हायरल इनफेक्शन) आहे. त्यामुळे घाबरून न जाता लक्षणे दिसताच वेळीच उपचार विश्रांती घेतल्यास आजार बरा होतो. आरोग्याची काळजी घ्यावी; मात्र सध्या जिल्ह्यात गंभीर स्थिती नाही,’’ अशी माहिती सीपीआर रुग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली.
देशभरातील विविध भागात ‘एच ३ व एन २’चे रुग्ण आढळत आहेत. हवामानातही बदल घडत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन शासकीय आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. नव्याने ‘एच ३ व एन २’ या विषाणूशी दोन हात करण्यासाठी सीपीआरचा नाक कान घसा व मेडीसन विभागाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वात गंभीर रुग्णांवर येथे उपचारांची सुविधा आहे. याबाबत डॉ. लोकरे यांनी दिलेली माहिती दिली.
-------------------
चौकट
काय आहे ‘एच ३ एन २’
‘स्वाईन प्लू’ने दहा वर्षापूर्वी थैमान घातले होते. तेव्हा एच १-एन १ हा विषाणूचा प्रादुर्भाव होता. त्याच विषाणूचे हे बदलेले स्वरूप आहे. ‘एच ३-एन २’ आहे. याची लक्षणाची तीव्रता कमी अधिक असते. हा विषाणू कोविडसारखा भासत असला तरी तो कोविड नव्हे हेही समजून घ्यावे.
-------------
लक्षणे ओळखा
- भरपूर ताप येतो तो चार पाच दिवस राहतो
- खोकला, सर्दी होते.
- नाकात घशात अंगाला वेदणा होतात. अशक्तपणा असतो.
- चार पाच दिवसानंतर ताप कमी होतो मात्र सर्दी खोकला हे दहा ते पंधरा दिवस राहू शकतो
------------
यांनी घ्यावी खबरदारी
- ६० वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्ती
- १५ वर्षा पेक्षा लहान बालके
- रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती
- अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती
- हृदय रुग्ण तसेच मधुमेही
- क्षयरुग्ण तसेच एचआयव्ही सोबत जगणारे
------------
उपाय योजना अशा
- तीन दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी
उन्हामुळे शरिरातील पाणी कमी होते. परिणामी प्रतिकार शक्ती होते तेव्हा अशक्तपणा जाऊ शकतो तसेच आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता असते त्यामुळे दिवसभरात तीन चार लिटर पाणी प्यावे
- संसर्ग थुंकीतून पसरतो त्यामुळे मास्क वापरावा गर्दीत जाणे टाळावे
- बाहेरून घरी आल्यानंतर स्वच्छता राखावी
- ॲन्टी बायोटीक किंवा ॲन्टी बॅक्टीरीयल औषध स्वतः घेऊ नयेत
- लक्षणानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत