भाजप महिला आघाडीतर्फे इचलकरंजीत आनंदोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप महिला आघाडीतर्फे इचलकरंजीत आनंदोत्सव
भाजप महिला आघाडीतर्फे इचलकरंजीत आनंदोत्सव

भाजप महिला आघाडीतर्फे इचलकरंजीत आनंदोत्सव

sakal_logo
By

ich1211.jpg
88574
इचलकरंजी : राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये महिलांचा सन्मान वाढवणाऱ्या घोषणा केल्याने भाजप महिला आघाडीतर्फे येथील बसस्थानकात आनंदोत्सव साजरा केला.
-------------------------------
भाजप महिला आघाडीतर्फे
इचलकरंजीत आनंदोत्सव
इचलकरंजी, ता. १२ : शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक घोषणा करत राज्यातील महिलांचा सन्मान वाढवला आहे. या निर्णयाचे स्वागत करत आज भाजप महिला आघाडीतर्फे आनंदोत्सव साजरा केला. येथील शिवतीर्थ इचलकरंजी बसस्थानकात महिलांनी साखर-पेढे वाटून आनंद साजरा केला. शिंदे-फडणवीस सरकारच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
अर्थसंकल्पामध्ये महिलांना ५० टक्के एसटी तिकीट मोफत दिले जाणार आहे. फार कमी खर्चात महिलांचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्करना १५०० रुपयांची भरीव मानधनवाढ दिली असून, हा महिलांचा सन्मान असल्याचा जयघोष भाजप महिला आघाडीने केला. शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय महिलांचा सन्मान वाढवणारा असून महिलांना आत्मनिर्भर होणे सोपे होणार असल्याचे भाजप महिला अध्यक्षा पूनम जाधव यांनी सांगितले. शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी मनोगत व्यक्त केले. अश्‍विनी कुबडगे, योगिता दाभोळे, शोभा वसवाडे, नीता भोसले, सरला घोरपडे, पूजा बेडकर, निर्मला कुरुंदवाडे, नागूबाई लोंढे, सारिका कडाळे, माधवी मुंडे, संगीता कांबळे आदी उपस्थित होते.