Tue, March 28, 2023

दंड माफ
दंड माफ
Published on : 12 March 2023, 5:43 am
‘सीपीआरची मागणी
मान्य केल्यास
पक्षपातीपणा ठरेल’
कोल्हापूर ः सीपीआरने घरफाळ्यातील १८ लाखांचा दंड माफ करण्याची मागणी केली आहे. ती मान्य केल्यास पक्षपातीपणा ठरणार असून, त्यामुळे या मागणीचा तातडीने निकाल लावावा अशी मागणी कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदूलकर यांनी पत्रकातून केली आहे.
पत्रकात म्हटले आहे, सीपीआरने थकीत ७२ लाख घरफाळ्यातील १८ लाख रुपये दंड माफ करावा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. ती मान्य झाल्यास पक्षपातीपातीपणा ठरणार आहे. त्याचं न्यायाने शहरातील सर्व मिळकतीवरील दंड माफ करा व जो वसुली केला आहे तो परत करा. त्या मागणीचा निकाल लावेपर्यंत इतरांकडून दंड भरुन न घेता कराची निव्वळ थकबाकी भरुन घ्या. तसेच सामान्यांच्या मिळकतीवर जसा बोजा चढवता तसाच बोजा चढविण्याची प्रक्रिया सुरू करावी.