रोलबॉल संघाचे अमितकुमार पाटील प्रशिक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोलबॉल संघाचे अमितकुमार पाटील प्रशिक्षक
रोलबॉल संघाचे अमितकुमार पाटील प्रशिक्षक

रोलबॉल संघाचे अमितकुमार पाटील प्रशिक्षक

sakal_logo
By

88632
रोलबॉल संघाचे अमितकुमार पाटील प्रशिक्षक
इचलकरंजी, ता. १२ ः रोलबॉल विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून अमितकुमार पाटील यांची निवड झाली आहे. रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने ही निवड करण्यात आली आहे. येथील गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. एशियन रोलबॉल खेळाचे ते आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत.
रोलबॉलच्या सहाव्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन २१ ते २६ एप्रिल दरम्यान श्री शिवछत्रपती स्पोर्टस कॉम्प्लेक्स म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे केले आहे. स्पर्धेत गतविजेता केनिया (२०१९), इजिप्त, ब्राझिल, नेदरलँड, डेन्मार्क, नेपाळ, बांग्लादेश, हॉगकाँग, स्वीडन, युनायटेड किंगडम, श्रीलंका असे वीसहून अधिक देश सहभागी होणार आहेत. निवडीबद्दल त्यांचे ना. बा. एज्युकेशन संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन किशन बोहरा, सचिव बाबासाहेब वडींगे यांच्यासह मुख्याध्यापक एस. एस. चिंचवाडे, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एच. कवठे, आर. जी. झपाटे, पर्यवेक्षक आर. डी. पिष्टे, व्ही. एस. लोटके, एस. एस. तेली यांनी अभिनंदन केले.