चौतीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौतीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र
चौतीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र

चौतीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र

sakal_logo
By

ich१२१३.jpg
88637
हेरले ः येथे स्नेह मेळाव्याच्यानिमित्ताने १९८८-८९ दहावी बॅचमधील हेरले हायस्कूलचे विद्यार्थी एकत्र आले होते.
------------------
चौतीस वर्षानंतर भेटले वर्गमित्र
हेरले हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
रुकडी, ता. १२ ः येथील हेरले हायस्कूलच्या १९८८-८९ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा ३४ वर्षांनंतर स्नेहमेळावा झाला. उद्योगपती सरदार आवळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी सर्व माजी विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींचा सत्कार केला.
काही दिवसांपूर्वी ऋणानुबंध हेरले हायस्कूल, हेरले नावाने सोशल मीडियावर ग्रुप तयार केला. त्यातूनच स्नेहमेळाव्याला मूर्तस्वरूप मिळाले. या कार्यक्रमासाठी नोकरी, व्यवसायानिमित्त परराज्यात, परजिल्ह्यात असणाऱ्या मित्रांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. त्यामुळे हा अविस्मरणीय सोहळा झाला. उद्योगपती आवळे, सतीश जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुनीर जमादार, ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे, माले सरपंच राहुल कुंभार, डॉ. उषादेवी वर्धन, आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महानंदा घुगरे, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राजेश जाधव, शिक्षक बॅंकेच्या माजी अध्यक्षा स्मिता डिग्रजे, भारत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमास मुनीर हजारी, प्रदीप सुरवशी, संजय हणमंत, मन्सूर बारगीर, पांडुरंग कोळेकर, बाबासाहेब कोळेकर, उमेश जाधव, अविनाश चौगुले, संजय जाधव, मंगल चव्हाण, रेहाना गलगली, सुनीता पाटील, आक्काताई कांबळे, दुर्गा कोठावळे, आनंदा हराळे, अनिल पाटील, बाबासाहेब सुरवशी, प्रधान मुंडे यांच्यासह ५२ विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सुत्रसंचालन मुनीर जमादार यांनी केले.