
नंदाताई गडकरींचा सत्कार
ich1215.jpg
88663
इचलकरंजी ः प्रामाणिकपणाबद्दल मनपा महिला कर्मचारी श्रीमती नंदाताई रघुनाथ गडकरी यांचा सत्कार केला.
-----------
नंदाताई गडकरींचा सत्कार
इचलकरंजी ः उद्यानात काम करीत असताना सापडलेले १२ ग्रॅमचे गंठण प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल मनपा महिला कर्मचारी श्रीमती नंदाताई गडकरी यांचा सत्कार केला. माजी नगरसेवक संभाजी काटकर यांच्याहस्ते हा सत्कार केला. डॉ. राजेश पवार, मुकुंद जोशी, श्रीकांत पाटील, बाजीराव कांबळे, अलाउद्दीन जमादार, दिलीप मगदूम, जालंदर कोरे, नवनाथ जाधव, युवराज गायकवाड, गजानन निंबाळकर, सुरेश चौगुले, मंजुनाथ खंदारे, विश्वनाथ माने, दशरथ हत्तीकर, सुनील गेजगे आदी उपस्थीत होते. मनपाच्या भगतसिंग उद्यानात एक जोडपे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे गंठण हरवले होते. श्रीमती गडकरी यांना हे गंठण सापडले. त्यांनी संबंधितांना हे गंठण प्रामाणिकपणे परत केले.