नाचणी, बाजरीचे नुडल्स, चॉकलेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाचणी, बाजरीचे नुडल्स, चॉकलेट
नाचणी, बाजरीचे नुडल्स, चॉकलेट

नाचणी, बाजरीचे नुडल्स, चॉकलेट

sakal_logo
By

L88687

नाचणीचे चॉकलेट, बाजरीचे
नुडल्स अन् ज्वारीचा पिझ्झा

मुलांसाठी ‘फास्ट’ नव्हे ‘खास’ फुड ः लक्षतीर्थ वसाहतीतील राजश्री सावंत यांचा प्रयोग

नंदिनी नरेवाडी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः मुलांना काय आवडते, असा प्रश्न विचाल्यास लगेचच उत्तर मिळते, चॉकलेट, नुडल्स, पिझ्झा आणि मोमोज. मात्र, यातील मैद्याच्या वापरामुळे याचे शरीरावर अपायकारक परिणाम होतात. लहानांसह मोठ्यांनाही आवडीचे तसेच पौष्टिक असणारे नाचणीचे चॉकलेट, बाजरीचे नुडल्स आणि ज्वारीचा पिझ्झा, मोमोज असे पौष्टिक पदार्थ लक्षतीर्थ वसाहतीतील राजश्री प्रल्हाद सावंत यांनी बनवले आहेत. या प्रयोगातून त्यांनी फास्ट फुडही पौष्टिक बनवून नाचणी, बाजरी अशा तृणधान्यांतून अनोख्या पदार्थांची निर्मिती केली आहे.
सावंत यांचे शिक्षण जेमतेमच. तरीही त्यांना स्वयंपाकात विशेष रूची. यातूनच स्वयंपाकघरात नानाविध पदार्थ करण्याचा छंदच लागला. त्यांनी स्वतःच्या मुलांना आवडतील म्हणून पौष्टिक असे नाचणी, बाजरीचे चॉकलेट बनविण्याचा प्रयोग घरात यशस्वीही केला. त्याच पद्धतीने त्यांनी नाचणी, बाजरी आणि ज्वारीचे नुडल्स, पुलाव, मोमोज, पिझ्झा आणि चॉकलेट बनवायला सुरूवात केली. त्यांचा हे प्रयोगही मुलांना आवडू लागले.
सध्या अपायकारक, तब्येत बिघडवणारे पदार्थ मुलांना आवडू लागले आहेत. याच पदार्थांना पारंपरिक टच दिला तर हे पौष्टिक घटक नक्कीच मुलांच्या पोटात जातील, असा विचार सावंत यांनी केला. याच विचारातून त्यांनी बरेच प्रयोग केले. यातूनच नाचणी, बाजरी, सोयाबीन आणि ज्वारी अशा तृणधान्यांचे चॉकलेट, नुडल्स, पिझ्झा आणि मोमोज जन्माला आले. राजश्री सावंत यांनी दहा वर्षांपूर्वी प्रक्रिया उद्योग सुरू केला. सध्या त्यांनी या उद्योगातून पौष्टिक असे पदार्थनिर्मितीलाही सुरूवात केली आहे. त्यांनी बनवलेली नाचणीची पुरणपोळी, पास्ता आणि पुलाव असे पदार्थही खवय्यांना आवडू लागले आहेत.

चौकट
शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण
सावंत स्वयंसिद्धा, आत्मा आणि कृषी विभागाशी जोडल्या गेल्या आहेत. या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना दुध प्रक्रिया, तृणधान्य प्रक्रियेतून अर्थाजन करता येईल असे आगळे - वेगळे पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण त्या देतात. आजवर १५० हून अधिक शेतकऱ्यांना त्यांनी हे प्रशिक्षण दिले आहे.
------
88688
कोट
फास्ट फुडमध्ये ईस्ट, ईसेन्स यांचा समावेश असतो. ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी तृणधान्यापासून विविध पौष्टिक पदार्थ सर्वांना आवडतील अशा पद्धतीने तयार केले. पोषण आहारात गर्भवती महिला व मुलांना हे पदार्थ दिल्यास निश्चितच त्यांना त्याचा फायदा होईल.
- राजश्री सावंत