
‘पेन्शन सायकलस्वार’ आर.डी. निकम यांचे कोल्हापुरात स्वागत
‘पेन्शन सायकलस्वार’
आर. डी. निकम निकम यांचे
कोल्हापुरात स्वागत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी यासाठी महाराष्ट्रात सायकलवरून प्रवास करत सेवानिवृत्त कर्मचारी आर. डी. निकम यांच्याकडून जनजागृती सुरू आहे. त्यांचे शनिवारी कोल्हापुरात आगमन झाले. जुनी पेन्शन हक्क संघटन आणि प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकारी, सभासदांनी त्यांचे स्वागत केले. त्यात अध्यक्ष किरण पाडळकर, सरचिटणीस मयूर जाधव यांचा समावेश होता.
निकम हे निवृत्त असताना देखील राज्यभर जुनी पेन्शन लढ्याच्या जनजागृतीसाठी सायकलने प्रवास करत आहेत. त्यांनी पेन्शन लढ्यातील शिलेदारांशी संवाद साधत नवीन प्रेरणा निर्माण केली. या वेळी विनोद भोंग, साताप्पा पाटील, संदीप सुतार, सुनील परीट, विनोदराजे गायकवाड, शिवशंभू घाटे, वसीम नायकवडी, मोहसीन मुजावर, विठ्ठल दुर्गुळे, झहीर शेख, निवेदिता माने, अश्विनी राणे, आदी उपस्थित होते.