‘क्रिएटीव्ह’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘क्रिएटीव्ह’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
‘क्रिएटीव्ह’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

‘क्रिएटीव्ह’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

sakal_logo
By

88733
गडहिंग्लज : क्रीएटिव्ह हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात कला सादर करताना ‘पूर्व प्राथमिक’चे विद्यार्थी.

‘क्रीएटिव्ह’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील क्रीएटिव्ह हायस्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागाचा ‘उत्सव गोंडस कलाकारांचा’ सांस्कृतिक कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव अण्णासाहेब बेळगुद्री अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक दिनकर रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेशवंदन नृत्याने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला चांगलीच दाद मिळाली. डॉ. रोहित देसाई, डॉ. सुषमा देसाई, सविता बेळगुद्री, डॉ. दिशा देसाई यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. संभाजी सावंत यांनी स्वागत केले. स्नेहा पारधे यांनी सूत्रसंचालन केले. प्रियांका पोवार यांनी आभार मानले.