
मराठा महासंघ धरणग्रस्तांना जेवण
फोटो - चेचर सर देतील.
...
धरणग्रस्तांच्या ठिय्याचा पंधरावा दिवस
मराठा महासंघाचा आंदोलनास पाठिंबा
कोल्हापूर, ता. १३ : गेले पंधरा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणग्रस्तांचा ठिय्या आहे. त्यांच्या जेवणासाठी दातृत्वाचे हात पुढे आल्यानंतर त्यांच्या पोटात अन्नाचे घास उतरतात. अखिल भारतीय मराठा महासंघाने धरणग्रस्तांच्या आंदोलनास आज पाठिंबा देत, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. सुमारे तीनशे धरणग्रस्तांना जेवण देत त्यांची आस्थेने विचारपूस केली.
धरणग्रस्तांचा प्रश्न सत्तर वर्षे प्रलंबित आहे. त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. कुटुंबासमवेत त्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या मारला आहे. समाजघटकांकडून त्यांना जेवण पुरवले जात असून, आज मराठा महासंघ त्यांच्या पाठिशी उभा राहिला.
महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी धरणग्रस्तांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी धरणे बांधताना ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ असा आदेश काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धरणग्रस्तांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत दानशूर लोकांनी धरणग्रस्तांच्या जेवण, नाश्त्याची यापुढे सोय करावी, असे आवाहन केले. याप्रसंगी निवृत्त पोलिस उपअधीक्षक पी. जी. मांढरे, व्ही. के. पाटील, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, संजय कांबळे, प्रकाश पाटील, विजय पाटील, किशोर ढवंग, कृष्णा पाटील, मनोज जाधव, संयोगिता देसाई, राजू मालवेकर उपस्थित होते.