
जे. पी. नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. उपासे
88807
शिवशंकर उपासे, सुभाष विभुते
जे. पी. नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. उपासे
आजरा : येथील शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांची, तर उपाध्यक्षपदी सुभाष विभुते यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपाली चौगुले निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अध्यक्षपदासाठी डॉ. उपासे यांचे नाव रवींद्र देसाई यांनी सुचविले. प्रकाश ओतारी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी विभुते यांचे नाव श्रावण जाधव यांनी सुचविले. शिवाजी बिद्रे यांनी अनुमोदन दिले. डॉ. उपासे व विभुते यांचा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार चौगुले यांच्या हस्ते झाला. स्थापनेपासून संस्थेची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी शिवाजी कांबळे, दयानंद उपासे, रवींद्र देसाई, मनोज गुंजाटी, श्रावण जाधव, शिवाजी बिद्रे, प्रकाश ओतारी, पुष्पलता घोळसे, भारती सूर्यवंशी उपस्थित होते. सचिव संतोष जाधव यांनी स्वागत व आभार मानले.