कमर्शिअल बँक मतमोजणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमर्शिअल बँक मतमोजणी
कमर्शिअल बँक मतमोजणी

कमर्शिअल बँक मतमोजणी

sakal_logo
By

88891
...


कमर्शिअल बँकेत सत्तारूढच कायम

कणेरकर- शिंदे पॅनेलवर पुन्हा विश्वास व्यक्त

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ : दि कमर्शिअल को-ऑप बँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले. बँकेसाठी काल मतदान झाले होते. आज मार्केटयार्ड येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी झाली. यामध्ये कणेरकर- शिंदे सत्तारुढ पॅनेल विजयी झाले. विजयानंतर विजयी उमदेवारांसह त्यांच्या कायकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उधळला.
कमर्शिअल बँकेच्या १४ जागांसाठी काल १६.९५ टक्के इतके मतदान झाले होते. यापूर्वी महिला गटातून शर्मिला कणेरकर, वैशाली शिंदे व मागासवर्गीय गटातून रामचंद्र कुंभार हे बिनविरोध विजयी झाले आहेत. आज सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी दुपारी संपूर्ण निकाल जाहीर केला.
कमर्शिअल बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न झाले. मात्र याला यश आले नाही. काल आयुर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलमध्ये मतदानालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मतदान केंद्रात मतदारांची वाट पहावी लागत होती. मतदान कमी झाल्यामुळे सत्तारूढ संचालकांना पुन्हा संधी मिळेल अशी चर्चा होती. पहिल्या फेरीपासून सत्तारूढ गटाला एकतर्फी मते मिळत गेली. सत्तारुढ संचालकांना दीड हजार मते होती. त्याचवेळी विरोधकांना तुलनेत कमी मतदान होते. मतांची आघाडी जसजशी वाढत गेली तसे सत्तारुढ गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
...

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

गौतम जाधव (२३४३ मते), प्रदीप जाधव (२३३५ मते), राजेंद्र डकरे (२३४४), अनिल नागराळे (२२९५), रामराव पवार (२२७५), उदय महाजन (२२६६), अतुल शहा (२२५०), भाऊसाहेब सावंत (२३५८), राजेंद्र संकपाळ (२१७०) मते मिळाली आहेत. अनुसूचित जाती जमातीमध्ये रविंद्र व्हटकर (२२०४) तर भटके विमुक्त जातीजमातीमधून युवराज गवळी (२००२) हे उमदेवार विजयी झाले. तर पराभूत अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणेः आनंदराव पाटील (५९०), प्रा. अमरसिंह शेळके (८६०), विजय कामत (५५०)