Sat, April 1, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रारंभ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रारंभ
Published on : 13 March 2023, 6:10 am
‘सीपीआर’मध्ये संपकऱ्यांची घोषणाबाजी
कोल्हापूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात ‘सीपीआर’मधील कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बारापासून संप सुरू केला. समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, अध्यक्ष वसंत डावरे यांच्यासह विविध संघटनांचे कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, रिक्तपदे भरली पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पदावरील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घ्या, आदी ‘सीपीआर’च्या चौकात घोषणा दिल्या. सीपीआर हॉस्पिटलमधील नर्सिंग फेडरेशन, परिचारिका संघटना, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना तसेच आरोग्य विभागातील सर्व संघटनांचे कर्मचारी उपस्थित होते. संजय क्षीरसागर, संजय खोत, उदय लांबोरे, विठ्ठल वेलणकर, रमेश भोसले, अनिल खोत, श्रीमंतीनी पाटील, भरत रसाळे सहभागी झाले होते.