कामकाज ठप्‍प, अभ्यागतांनी फिरवली पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामकाज ठप्‍प, अभ्यागतांनी फिरवली पाठ
कामकाज ठप्‍प, अभ्यागतांनी फिरवली पाठ

कामकाज ठप्‍प, अभ्यागतांनी फिरवली पाठ

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

कामकाज ठप्‍प, अभ्यागतांनी फिरवली पाठ

कंत्राटी कर्मचाऱ्यां‍वर मदारः जिल्‍हा परिषदेचे ७ हजार १२५ कर्मचारी संपात सहभागी

कोल्‍हापूर, ता.१४: जुनी पेन्‍शन मिळावी यासाठी सुरु असलेल्या बेमुदत बंद आंदोलनाला कर्मचाऱ्यां‍चा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्‍हा परिषदेचे सर्व कर्मचारी संपात असल्याने एरव्‍ही शासन, प्रशासनाच्या खिजगणतीत नसणाऱ्या‍ कंत्राटी कर्मचाऱ्यां‍वरच जिल्‍हा परिषद सुरु ठेवण्याची महत्‍वाची जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी सकाळीच खातेप्रमुखांची आढावा बैठक घेत संपाची माहिती घेतली. तसेच दिवसभर कोणीही मुख्यालय सोडू नये, असे आदेश त्यांनी दिली. या संपात जिल्‍हा परिषदेचे ७ हजार १२५ कर्मचारी सहभागी झाले आहेत.

जुन्या पेन्‍शनसाठी राज्यभर बेमुदत बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जिल्‍हा परिषदेतील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिल्‍हा परिषदेच्या ११ हजार ९९ पैकी ७ हजार १२५ कर्मचाऱ्यां‍नी या बेमुदत आंदोलनात सहभाग घेतला आहे. तर ३९२ कर्मचारी रजेवर असून ३ हजार ५८२ कर्माचऱ्यां‍नी संपात सहभागी न होता, कामकाजाला प्राधान्य दिले. जिल्‍हा परिषद वाहन चालक संघटनेने काळ्या फिती लावून काम केले. तर ज्या कर्मचाऱ्यां‍ना निवृत्तीसाठी काही महिने बाकी आहेत, अशा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यां‍नी कामावर हजेरी लावली.

कर्मचाऱ्यां‍सोबत प्राथमिक शाळेतील शिक्षकही या संपात सहभागी झाले. शिक्षक संपावर गेल्याने शाळेत आलेले विद्यार्थी आल्या पावली परत गेले. तर जिल्‍हा परिषदेत कामानिमित्त येणारे लोकप्रतिनिधी, कंत्राटदार यांनीही मुख्यालयाकडे आज पाठ फिरवली. यामुळे संपूर्ण जिल्‍हा परिषदेत शुकशुकाट पहायला मिळाला.
....

फुटीर कर्मचाऱ्यां‍बाबत नाराजी

एका बाजूला आंदोलन करणाऱ्या‍ कर्मचारी नेत्यांसोबत दाखवण्यासाठी फोटो काढायचे व नंतर हळूच जिल्‍हा परिषदेत कामकाज करण्यासाठी उपस्‍थित राहण्याचा प्रकार काही कर्मचाऱ्यां‍बाबत घडला आहे. काही पी.ए.नी देखील कामावर अनधिकृत हजेरी लावून साहेबांची ''मर्जी'' संपादन करण्याचा प्रयत्‍न केला. याबाबत कर्मचारी संघटना प्रतिनिधींनी नाराजी व्यक्‍त केली.