Wed, March 29, 2023

कोतोलीत पोलिस चौकी
सुरू करण्याची मागणी
कोतोलीत पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी
Published on : 14 March 2023, 2:09 am
कोतोलीत पोलिस चौकी
सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर, ता. १४ : कोतोली (ता. पन्हाळा) येथील बाजारपेठेत भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडा बाजार मंगळवारी असतो. या दिवशी या चोऱ्यांच्या प्रकार सतत घडत असतात. याकरिता भागातील बाजारपेठेचे केंद्र, व्यावसायिक, लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना मागणीचे निवेदन स्वीकारले. जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कांबळे, सरचिटणीस शशिकांत जाधव, बाळकृष्ण गवळी, नाथाजी राजमाने, पी. के. पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.