गोडसाखर कामगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर कामगार
गोडसाखर कामगार

गोडसाखर कामगार

sakal_logo
By

89239

गडहिंग्लज : ‘गोडसाखर’ कामगारांच्या थकीत देण्यांसंदर्भात प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, श्री. जाधव यांच्याशी चर्चा करताना शिवाजी खोत व कामगार.
--------

सामूहीक आत्मदहनाचा इशारा

‘गोडसाखर’ निवृत्त कामगार : थकीत देण्यांच्या बैठकीस कारखाना व्यवस्थापन गैरहजर

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. १५ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांसाठी आज प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीस कारखाना व्यवस्थापन गैरहजर राहिले. यामुळे, देण्यांसंदर्भात तातडीने निर्णय न झाल्यास सामूहीक आत्मदहनाचा इशारा कामगारांनी यावेळी प्रांताधिकाऱ्यां‍ना दिला.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व प्रादेशिक साखर कार्यालयाचे अधीक्षक श्री. जाधव यांच्या उपस्थितीत आज कारखाना व कामगारांची संयुक्त बैठक आयोजिली होती. कारखाना व्यवस्थापन व कामगारांनी एकत्रित येवून हा प्रश्‍न संपवण्याच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार होती. परंतु कारखाना व्यवस्थापनाकडून कोणीही हजर न राहिल्याने ही बैठक निष्फळ ठरली. निवृत्त कामगारांतर्फे शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ हजर होते. कामानिमित्त बाहेर असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकत नसल्याचा निरोप कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांनी दिल्याचे श्री. वाघमोडे यांनी सांगितले. यावेळी खोत यांनी पुढील दोन ते तीन दिवसांत पुन्हा बैठक आयोजित करण्याची मागणी केली. त्यावर वाघमोडे यांनी अध्यक्ष व कार्यकारी संचालकांशी दूरध्वनीवरुन बोलून तारीख घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी कारखान्यावर कामगारांचे शिष्टमंडळ आल्यास त्यांच्यासमोर भूमिका मांडू, अशी ग्वाही दिली. त्याला खोत व कामगारांनी नकार दिला. बैठक कुठेही घ्या, पण अधिकाऱ्यां‍च्या उपस्थितीतच ती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
खोत म्हणाले, ‘अडीच वर्षांपासून आंदोलन सुरु असूनही अद्याप तोडगा निघालेला नाही. कारखाना व्यवस्थापन केवळ वेळकाढूपणा करीत आहे. कारखाना आर्थिक अडचणीत आहे हे मान्य आहे. आताच पैसे पाहिजे असा कामगारांचा आग्रहही नाही. परंतु देय रक्कमेचे नियोजन कसे केले आहे, किती हप्त्यात ही रक्कम देणार याची माहिती कामगारांना हवी आहे. त्यासाठी अधिकारी, कारखाना व कामगार अशा समन्वय बैठकीची गरज आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून वारंवार असा प्रकार होत असल्याने प्रशासनाने अ‍ॅक्शन मोडवर यावे.’
...


* शुक्रवारपूर्वी बैठकीची ग्वाही

दरम्यान, बैठकीची तारीख घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. त्यामुळे श्री. वाघमोडे व श्री. जाधव यांनी जिल्हाधिकारी, प्रादेशिक सहसंचालक डॉ. गाडे यांच्याशी संपर्क साधून बैठकीच्या तारखेबाबत चर्चा केली. त्यानंतर, शुक्रवारपूर्वी (ता. २४) पुन्हा एकदा समन्वय बैठकीचे आयोजन करण्याची ग्वाही श्री. वाघमोडे यांनी कामगारांना दिली.