
व्यापारी संकुलाच्या नामकरणासाठी निवेदन
व्यापारी संकुलाच्या
नामकरणासाठी निवेदन
इचलकरंजी,ता. १५ : चांदणी चौकातील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलाला श्री संत कक्कया महाराज यांचे नांव द्यावे, अशी मागणी इचलकरंजी शहर दलित पँथर व वीरशैव कक्कया ढोर समाजातर्फे महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी स्वीकारले. चांदणी चौक या परिसरात बहुसंख्येने ढोर समाजाची वस्ती आहे. याच भागात महानगरपालिकेची व्यापारी संकुल आहे. या संकुलाला राजकीय मंडळी अन्य व्यक्तींची नांवे देण्याच्या प्रयत्न करीत आहेत. अशी कृती झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी युवराज जाधव, किरण शेरखाने, शशिकांत ओहळ, सचिन कांबळे, सचिन जाधव, सचिन शेरखाने, सचिन ओहोळ, दीपक जाधव यांच्यासह ढोर समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------
हिंदु परिषद जिल्हा अध्यक्षपदी किशोर मोदी
इचलकरंजी, ता. १५ : डॉ. प्रविणभाई तोगडीया यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेच्या कोल्हापुर जिल्हा अध्यक्षपदी इचलकरंजीचे किशोर मोदी यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी जिल्हा मंत्रीपदी पंढरीनाथ ठाणेकर, विशेष जिल्हा संपर्क प्रमुखपदी संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी दत्ता पाटील, तर जिल्हा राष्ट्रीय बजरंग दल संयोजकपदी जितेंद्र मस्कर यांची निवड करण्यात आली. सदर मेळावा खामकर हॉल, इचलकरंजी येथे झाला. या वेळी अन्य पदाधिकाऱ्यांनाही निवडीचे पत्र देण्यात आले. या वेळी प्रविणभाई तोगडीया यांनी व्हिडोओ कॉन्फरन्सद्वारे संवाद करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.