मूर्ती तपासणीवेळी लेप काढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मूर्ती तपासणीवेळी लेप काढला
मूर्ती तपासणीवेळी लेप काढला

मूर्ती तपासणीवेळी लेप काढला

sakal_logo
By

लोगो मूर्ती संवर्धन

मूर्ती तपासणीवेळी लेप काढला
न्यायालयात शपथपत्र; पुढील सुनावणी २१ ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः श्री अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी नवरात्रोत्सव काळात घाईत केलेल्या लेपाबद्दल आज हक्कदार पुजाऱ्यांकडून न्यायालयात आज शपथपत्र सादर केले. मूर्तीची तपासणी करताना मूर्तीवरील लेप काढून घेतल्याचे त्यात म्हटले आहे. मूर्ती संवर्धनादरम्यान करण्यात येणाऱ्या बाबींची माहिती देवस्थान समितीने न्यायालयाला द्यावी, असाही अर्ज आज न्यायालयात सादर केला. अर्जावर २१ मार्चला पुढील सुनावणी होईल. दिवाणी न्यायाधीश व्ही. डी. भोसले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे मंगळवारी केंद्रीय पुरातत्त्‍व विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी अंबाबाई मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर या पाहणीतील काही संदर्भ देऊन आज हक्कदार श्री. पूजक असलेले माधव मुनीश्र्वर यांनी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे, की अंबाबाई मूर्तीचे पुन्हा संवर्धन करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यासाठी अधिकाऱ्यांना मूर्तीची पाहणी करण्यासाठी बोलविले होते. याबाबत माहिती कळाल्यानंतर मी त्यांच्यासोबत मंदिरामध्ये आतील गाभाऱ्यात हजर राहिलो. एकूण चार अधिकारी मंगळवारी (ता. १४) मूर्तीची पाहणी करण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास आले होते. मूर्तीची पाहणी करीत असताना मी तेथे हजर होतो. त्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली. पाहणी करताना त्यातील एका अधिकाऱ्याने मूर्तीच्या चेहऱ्यावर १८ सप्टेंबर २०२२ रोजी केलेल्या संवर्धनाचा लेप काढला. तसेच नाकावरील सुद्धा लेप काढला. थोडावेळ पाहणी करून ते अधिकारी तेथून निघून गेले. तपासणी करणारे अधिकारी हे आतील गाभाऱ्यात साधारण २५ मिनिटे होते.