पद्माराजे उद्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्माराजे उद्यान
पद्माराजे उद्यान

पद्माराजे उद्यान

sakal_logo
By

‘प्रिन्सेस पद्माराजे
उद्यानातील विरंगुळा
केंद्र रद्द करावे’

कोल्हापूर, ता. १५ ः शिवाजी पेठेतील प्रिन्सेस पद्माराजे उद्यानामध्ये महापालिकेच्यावतीने बांधले जाणारे विरंगुळा केंद्र रद्द करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, प्रिन्सेस पद्माराजे उद्यानाजवळ सावित्रीबाई फुले कन्याशाळा आहे. तसेच जवळ छोटी-छोटी घरे आहेत. त्यांना फिरण्यासाठी याच उद्यानाचा पर्याय आहे. नागरीकरणामुळे उद्यानाची लांबी, रुंदी कमी झाली आहे. तिथे ज्येष्ठ लोकांसाठी विरंगुळा केंद्र मंजूर केले आहे. परंतु, उद्यानात कोणतेही बांधकाम करण्यास स्थानिकांचा विरोध आहे. यापेक्षा पर्यावरणपूरक तसेच स्वच्छता बाबींकडे लक्ष देऊन दुरुस्ती व्हावी. विरंगुळा केंद्रास विरोध नाही, फक्त उद्यान सोडून इतर ठिकाणी त्याचे बांधकाम करावे. उद्यानात दारू व अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत असून, विरंगुळा केंद्र बांधल्यास त्याचा वापर त्यासाठी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. अजित हारूगले, सुनील मोरे, युवराज बचाटे, बळीराम माने, अजय इंगवले, संजय इंगवले, संजय भांदिगरे आदींनी निवेदन दिले.