
इचल :आंदोलन
ich165.jpg
89451
इचलकरंजी : काम बंद आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रांत कार्यालयाबाहेर शिक्षक संघटनांकडून घंटानाद करण्यात आला. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
शिक्षक संघटनांतर्फे ‘प्रांत’समोर घंटानाद
इचलकरंजी, ता. १६ : इचलकरंजी शहर परिसरातील शिक्षक संघटनांनी काम बंद आंदोलनाच्या आज तिसऱ्या दिवशी प्रांत कार्यालयासमोर घंटानाद करून निदर्शने केली. यावेजुनी पेन्शन मंजूर होत नाही, तोपर्यंत विविध पद्धतीने निदर्शने करणार असल्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले. मात्र, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तिसऱ्या दिवशीही इचलकरंजी शहरातील शिक्षक संघटनांनी प्रांत कार्यालयावर एकत्र येत निदर्शने केली. शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी घंटानाद करीत घोषणाबाजी केली. दरम्यान, शिक्षकांनी बोर्डाच्या परीक्षेचे कामकाज सुरू ठेवले असले तरी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितल्याने नागरिकांमधून नाराजी उमटत आहे.